Krushi Yantrikikaran Yojana
Krushi Yantrikikaran Yojana 2023 जर अनुसूचित जाती-जमातीत मधील असाल तर 50% अनुदान आहे आणि जर इतर वर्गामध्ये असाल तर ४० टक्के अनुदान आहे. राज्य सरकारच्या या कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहे.
कागदपत्र
- आधार कार्ड,
- बँकेचे पासबुक,
- सातबारा,
- आठ अ,
- यंत्र खरेदी केलेला जीएसटी बिल,
- जातीचा दाखला,
- स्वयंघोषणापत्र,
- पूर्वसंबंधी पत्र, Krushi Yantrikikaran Yojana 2023
पडीक जमिनीतुनही करता येईल लाखोंची कमाई, सरकारची ही स्किम माहितेय का?
Krushi Yantrikikaran Yojana 2023 पात्रता
- ज्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- त्याच्या नावावर स्वतःचा सातबारा असणं आवश्यक आहे.
- अर्जदार हा अनुसूचित जाती आणि जमाती या विभागात मोडत असेल तर त्याचं जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट सादर करावे लागेल.
- जर लाभार्थ्याला ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर तो ट्रॅक्टर त्याच्या नावावर असणं आवश्यक आहे.
कापसाला युरिया खताचा वापर केव्हा करावा आणि किती?
कोण कोणते अवजारे खरेदी करू शकता
- ट्रॅक्टर,
- पॉवर टिलर,
- ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित वेगवेगळे अवजारे,
- मनुषचरित अवजारे,
- बैलचलित अवजारे,
- प्रक्रिया संच,
- किंवा कापणी पश्चात एखादा प्रक्रिया संच असेल ते याच्या अंतर्गत घेऊ शकता,
- अशा प्रकारचे वेगवेगळे अवजारे या योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता. Krushi Yantrikikaran Yojana 2023
देशातील बाजारात टोमॅटो आवक कशी होतेय?
Krushi Yantrikikaran Yojana 2023 ऑनलाइन अर्ज, कोठे करावा
- ऑनलाईन महाराष्ट्र राज्याचं अर्ज एक योजना अनेक अंतर्गत एक महाडीबीटी पोर्टल आहे त्या पोर्टल ची लिंक वर दिलेली आहे.
- त्या पोर्टल वर जायचं आहे स्वतःचा अकाउंट अगोदर बनवा अकाउंट बनवल्यानंतर स्वतःची कागदपत्र अपलोड करा.
- म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, जमिनीचा सातबारा, आठ अ, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, हे अगोदरच त्या ठिकाणी अपलोड करा.
- त्यानंतर अर्ज एक योजना अनेक याचा अर्थ चेक आहे की एकाच अर्जामध्ये वेगवेगळ्या योजना आपलय करू शकता.
- जर 50 योजना आपलाय करायच्या असेल तर एकाच अर्जात करू शकता.
- किंवा ह्या कृषी यांत्रिकीकरण योजने साठी एकच अर्ज करायचा असेल तरी करू शकता.
- आणि जास्त योजना एका अर्जात करा किंवा एकच योजना एका अर्जात करा फी तेवढीच असणार आहे.
- वीस किंव्हा 22 रुपये त्या अर्जाची फी आहे तो अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पडताळणी होईल.
- आणि त्याची पूर्व संमती येईल म्हणजे अप्रुवल येईल.
- ती पूर्व संमती डाउनलोड करायची आहे एक काळजी घ्या.
- पूर्व संमती लेटर आल्यानंतरच अवजारांची किंवा ज्यासाठी योजना अप्लाय केली आहे ती वस्तू खरेदी करायची आहे.
- खरेदी करताना स्वतःच्या नावावर करा जीएसटी बिल घ्या त्यानंतर ते जीएसटी बिल त्या पोर्टल वर अपलोड करा.
- जीएसटी बिल अपलोड केल्यानंतर पुन्हा एकदा बेनिफिकेशन होईल मग बँक खात्याचे डिटेल्स टाकावे लागणार आहे.
- आणि जे काही अनुदान आहे ते थेट बँकेमध्ये जमा होणार आहे.
- जर सुरुवातीला ह्या गोष्टी मोबाईल वर नाही कळाली तर जवळच्या एखाद्या कम्प्युटर कॅफेमध्ये जा सायबर कॅफेमध्ये जा आणि या योजने बद्दल संपूर्ण माहिती घ्या.
- आणि ही योजना भरा कोणत्याही अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही महाडीबीटी पोर्टल वर जवळजवळ महाराष्ट्रातील सर्वच कृषी योजनांचा लाभ घेऊ शकता.
Maharashtra Loan Scheme 2023 :मिळवा सरकारकडून थेट कर्ज
MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी