WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

cement godown ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान’ सन २०२४-२५ अंतर्गत अन्नधान्य पिके फ्लेक्झी घटक या घटकांतर्गत गोदाम उभारणी, पंपसंच, बीजप्रक्रिया यंत्रासह अन्य योजनांसाठी वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी कंपन्या, शेतकरी गटांसाठी योजना राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

cement godown

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेमध्ये गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येईल. त्याच्या निकषानुसार अन्नधान्य साठवणुकीसाठी २५० मेट्रिक टन क्षमतेसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. ही बाब बँक कर्जाशी निगडित असून, इच्छुक अर्जदार (शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एफपीओ, एफपीसी) केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे.

cement godown

शिवाय बीजप्रक्रिया संचासाठी अनुदान मिळेल. त्याच्या निकषात उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीजप्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी (यंत्रसामग्री ब बांधकामासाठी) प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.

cement godown

केवळ आधारकार्डवर मिळणार 50 हजारांचे कर्ज; जाणून घ्या सरकारची नवी योजना

शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम / यंत्र यासाठीही अनुदान योजना आहे. त्याच्या निकषानुसार बियाण्यास मोठ्या प्रमाणावर बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी गटामार्फत बीज प्रक्रिया ड्रम / यंत्र खरेदीसाठी रुपये ८००० प्रति युनिट किंवा किमतीच्या ५० टक्के अनुदान मिळेल.

पाण्याच्या स्रोतापासून शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाइपही पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० टक्के किंवा १५ हजार रुपये प्रति लाभार्थी अनुदान मिळेल. तसेच पंप संच घेण्यासाठीही ५० टक्के किंवा १० हजार रुपये देण्यात येतील. पण यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

cement godown

👉 वाचा सविस्तर माहिती 👈

२५ जुलैपर्यंत मुदत cement godown

वरील सर्व बाबीसाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एपीओ, एपीसी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी पात्र असणाऱ्या बाबीसाठी तालुकास्तरावर ऑफलाइन, ऑनलाइन पद्धतीने २५ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत, त्याशिवाय अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले.

cement godown

रोजगार हमी योजना कांदा चाळ वैयक्तिक शेतकऱ्यांना नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!