gir cow milk राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. एक जुलैपासून हे दर लागू असतील.
gir cow milk
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचे अनुदान देण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे.
एक जुलैपासून हे दर लागू असतील. दूध पावडरसाठी प्रतिकिलो ३० रुपयांचे अनुदान देण्यावरही आजच्या बैठकीत शिक्कमोर्तब करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
दूध अनुदान
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी विखे पाटील यांनी राज्यभरातील सहकारी व खासगी दूध उत्पादक संघ आणि दूध उत्पादक शेतकरी यांची तातडीची बैठक मंत्रालयात बोलावली होती, या बैठकीत विखे पाटील यांनी शेतकरी आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेतल्या. gir cow milk
शुरू करना चाहते हैं डेयरी, तो 25 गायों की खरीद पर मिलेगी 31 लाख रुपये की सब्सिडी
gir cow milk
त्यांच्या मागण्या विचारात घेता राज्यातील सर्व खासगी व सहकारी दूध संघांनी शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये भाव देण्याचे सर्वानुमते निश्चित केल्याचे सभागृहाला सांगितले. त्यानंतर शासनाकडून पाच रुपये प्रतिलिटरचे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.
त्यामुळे शेतकऱ्याला प्रतिलिटर ३५ रुपये मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी ग्वाही विखे पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.