CIDCO Lottery
CIDCO Lottery मुंबईसारख्या भल्या मोठ्या मायानगरीमध्ये स्वतःचं घर घेणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. सध्या घरांचे दर हे गगनाला भेटले असता लाख आणि कोटींच्या घरात गेले असताना सिडको आणि म्हाडा यासारख्या संस्था सर्वसामान्यांच्या घराचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी आशेचा किरण ठरतात.
म्हणूनच सिडको आणि म्हाडा या गृहनिर्माण संस्थांच्या घरांसाठी अर्ज निघाले की प्रत्येक जण यामध्ये घर घेण्यासाठी धडपड करीत असतो. आता मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षीच्या सिडको लॉटरी ची आता सोडत होणार आहे. ही सोडत 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सुमारास होणार आहे. CIDCO Lottery
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सिडको ने 332 घरांची योजना जाहीर केली होती. ही योजना तळोजा आणि द्रोणागिरी नोड मधील घरांसाठी होती. त्यासाठी 16 एप्रिल पर्यंत अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. तर त्यानंतर 19 एप्रिलला संगणकीय सोडत काढण्यात येणार होती मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली.
10 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दलात मोठी भरती; असा करा अर्ज
त्यानंतर सात जुलैचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर ही विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली मात्र अखेर आता सोडतीचा मुहूर्त लागला असून विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर म्हणजे 12 जुलै नंतर 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सोडत काढली जाणार आहे.
CIDCO Lottery
सोडती नंतर त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता विजयी अर्जदारांच्या नावांची यादी देखील जाहीर केली जाणार आहे आणि न जिंकलेल्या अर्जदारांना 29 जुलैला अनामत रकमेचा परतावा मिळणार आहेत अशी माहिती सिडकोकडून देण्यात आलेली आहे. या बातमीमुळे नक्कीच ज्याने ज्याने सिडको साठी अर्ज केला होता त्यांना दिलासा मिळाला आहे.
👉 योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा 👈
खरंतर मुंबई आणि आसपासच्या भागांमध्ये घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या आहेत.मात्र सिडको कडून परवडणाऱ्या दरावर ही घर उपलब्ध करून देण्यात येतात. सिडको ने तळोजा आणि द्रोणागिरी येथील 3322 घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यापैकी 61 घर द्रोनागिरी नोड आणि 251 घरात तळोजा येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. तर द्रोणागिरीतील 374 आणि तळोजातील 2636 घर सर्वसाधारण घटकांसाठी आहेत. CIDCO Lottery