1.5 lakh loan
1.5 lakh loan केंद्र आणि राज्य सरकार समाजातील आर्थिक दुर्बल घटक, महिला तसेच तरुणांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असून या योजनांच्या माध्यमातून अशा घटकांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत करण्यात येते. जेणेकरून यामुळे अशा घटकाचे सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचवावे हा त्यामागचा उद्देश आहे.
‘गुगल पे’ बंद, नेमकं कारण काय?
याच पद्धतीने जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग बंधूंसाठी देखील बीज भांडवल योजना राबवली जाते व या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय उभारून रोजगार निर्माण करता यावा याकरिता ही योजना खूप महत्त्वाची आहे.
विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून सन 2024-25 या वर्षाकरिता अर्ज देखील मागवण्यात येत आहेत व याकरिता पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन देखील समाज कल्याण विभागाने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.
👉 अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
दिव्यांगांना या व्यवसायांसाठी मिळते बीज भांडवल
बीज भांडवल योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बंधूंना स्वतःचा उद्योग, व्यवसाय किंवा शेती क्षेत्राशी संबंधित एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत राष्ट्रीयकृत असलेल्या बँकांच्या माध्यमातून परतफेडीच्या रूपाने सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. 1.5 lakh loan
या योजनेअंतर्गत दिव्यांगांना भांड्याचे दुकान, कापड दुकान तसेच किराण्याचे दुकान, झेरॉक्स मल्टी सर्विस, मसाला उद्योग व कृषी सेवा केंद्र इत्यादी करिता बीज भांडवल उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे कर्ज बँकेच्या नियमांच्या अधीन राहून मंजूर केले जाते.
व त्यानंतर समाज कल्याण विभागाकडून मंजूर झालेल्या एकूण कर्ज रकमेच्या 20 टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.
पात्र असलेल्या व्यक्तींनी अर्ज करताना त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडून हा अर्ज समाज कल्याण कार्यालय येथे सादर करणे गरजेचे आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत सात जून ते आठ जुलै पर्यंत आहे.
काय आहेत या योजनेचे नियम व अटी? 1.5 lakh loan
1- यासाठी अर्ज करणारा व्यक्ती हा दिव्यांग प्रवर्गातील म्हणजेच अंध, कर्णबधिर, अस्थीव्यंग असलेले व्यक्ती अर्ज करू शकणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये बौद्धिक अक्षम म्हणजेच मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तीला अर्ज करता येणार नाही.
2- अर्जदाराचे वय किमान 18 ते कमाल पन्नास वर्षाच्या आत असावे.
3- तसेच मार्च 2025 पर्यंत वैध असलेला उत्पन्नाच्या आतील उत्पन्नाचा दाखला जोडणे गरजेचे आहे.
3- तहसीलदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
4- बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र व ठराविक व्यवसायासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे.
5- तसेच रेशन कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र 40% किंवा त्यापुढे असावे. अर्ज करताना दोन पासपोर्ट फोटो त्यास जोडावे.
6- तसेच व्यवसायाचे कोटेशन व प्रोजेक्ट रिपोर्ट देखील जोडावा. 1.5 lakh loan
7- व्यवसायासाठी असलेली जागा जर भाड्याने असेल तर त्या संबंधीची भाडे पावती तसेच करारनामा, जागेचा मालकी हक्क पुरावा इत्यादी जोडावे.