Vihir Anudan Yojana 2023
Vihir Anudan Yojana 2023 जुन्या विहिरीची दुरुस्ती, शेततळ्यांचे अस्तरीकरण, ठिबक, तुषार व सूक्ष्म सिंचनाचा देखील लाभ योजनेतून आदिवासी शेतकऱ्यांना दिला जातो.
सामाजिक न्याय विभाग
- Vihir Anudan Yojana 2023 सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आदिवासी समाजातील लाभार्थीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना विभागामार्फत राबविली जात आहे.
- या योजनेतून पात्र लाभार्थीना नवीन विहीर बांधकामासाठी शंभर टक्के म्हणजे २ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते
- शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक पिके घेण्यासाठी सिंचन सुविधा उपलब्ध असने अतिशय महत्त्वाचे आहे.
- उपलब्ध असणे अतिशय महत्त्वाचे आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेद्वारे सिंचन सुविधेसाठी अनुदान उपलब्ध झाल्याने शेतकन्यांना आपले कृमी उत्पन्नवाढीसाठी मोलाची मदत झाली आहे.
- या योजनेचा लाभ घेतलेले अनेक शेतकरी एकापेक्षा जास्त पिके घेऊ लागले आहे.
- पर्यायाने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे इतरही शेतकऱ्यांनी या योजनेकरिता अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कुसुम महाउर्जा लॉगीन ला करताना error येतोय
Vihir Anudan Yojana 2023 योजनेच्या लभाकरिता या आहेत अटी व शर्ती
- योजनेच्या लाभासाठी लाभार्थी अनुसूचित जमाती या घटकातील शेतकरी असावा.
- शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातप्रमाणपत्र असावे.
- शेतकऱ्याकडे त्यांच्या स्वतःच्या नावे ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टरपर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्यांच्या नावे जमीन धरणेचा सातबारा व ८ अ उतारा, आधारकार्ड आवश्यक आहे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.
- दारिद्यरेषेखालील लाभार्थीस प्राधान्य दिले जाते.
- लाभार्थी दारिद्यरेषेखालील नसल्यास सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजारांच्या आत असावे.
- नवीन विहिरीचा लाभ घेण्यासाठी नवीन विहीर घ्यावयाच्या स्थळापासून ५०० फुटांच्या अंतरामध्ये दुसरी विहीर नसावी;
- तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- नवीन विहिरीसाठी यापूर्वी केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेतून नवीन विहिरीचा लाभ घेतलेला नसावा.
Spiny gourd ही जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, त्यात आश्चर्यकारक औषधी गुणधर्म आढळतात
असे मिळतेय शासनाकडून अनुदान
- काम. अनुदान.
- विहीर दुरुस्तीसाठी ➡️५०,००० रु
- इनवेल बोअरिंगसाठी ➡️२०,००० रु
- डिझेल, विद्युतपंपासाठी ➡️ २०,००० रु
- वीजजोडणी आकारासाठी ➡️१०,००० रु
- शेततळ्यांचे अस्तरीकरण ➡️१,००,००० रु
- सूक्ष्म व ठिबक सिंचन संच ➡️५०,००० रु (प्रत्येकी)
- तुषार सिंचनासाठी ➡️ २५,००० रु
- पीव्हीसी, एचडीपी पाइपासाठी ➡️ ३०,००० रु
Pik Vima :पीक विमा; ३.५० लाख शेतकऱ्यांचा सहभाग? पाहा कोणाला होता येईल सहभागी?
Pik Vima Payment Error 2023 :पेमेंट होत नाहीये असे करा पीक विमा पेमेंट